ताजे अपडेट

सेवानिवृत्त सुभेदार शामराव विठ्ठल कागणकर यांचा सेवानिवृती निमित्त सत्कार

चंदगडः ८ मराठा भारतीय सैन्यदलातील सुभेदार शामराव कागणकर यांचा सेवानिवृत्ती समारंभ १ जानेवारी रोजी चंदगड तालुक्यातील त्यांच्या गावी तावरेवाडी येथे त्यांच्या सन्मानार्थ भव्य सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता तावरेवाडी येथे होणार आहे. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश न.पाटील, गोपाळराव पाटील,भरमूआण्णा पाटील, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

देशसेवेचा प्रदीर्घ काळ अभिमानाने निभावणाऱ्या सुभेदार कागणकर यांच्या कार्याचा गौरव व सन्मान करण्यासाठी आयोजित या समारंभास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त कागणकर परिवारातर्फे करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका