ताजे अपडेट
Trending

९५ गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकित एफ आर पी बँक खात्यात जमा

दौलत-अथर्व प्रशासनाकडून ऐतिहासीक पाऊल

दौलत-अथर्व व्यवस्थापनाकडून ऐतिहासिक पाऊल , चंदगड तालुक्यातील ९५ गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफ.आर.पी. रक्कम बॅक खात्यात जमा

हलकर्णी (ता. चंदगड) : दीर्घ प्रतीक्षेनंतर चंदगड तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेडने चालवायला घेतलेल्या दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने तासगावकार शुगरच्या काळातील २०१०-११ हंगामातील थकीत एफ.आर.पी. आणि ऊस बिले सोमवारी दि 20/10/2025 रोजी 5 टप्यातिल पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली व आतापर्यंत चंदगड तालुक्यातील तब्बल ९५ गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एफ.आर.पी. रक्कम जमा करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली होती. तासगावकर शुगर काळातील एफ.आर.पी. आणि ऊस बिले विविध कारणांमुळे थकलेली होती. शासनस्तरावर व बँकस्तरावर पडताळणी प्रक्रिया सुरू असली तरी दीर्घकाळ ती ठप्प होती. यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण होते. मात्र अथर्व दौलत व्यवस्थापनाने या प्रलंबित प्रश्नावर गांभीर्याने लक्ष देत एफ.आर.पी. थकबाकीची पडताळणी जलद गतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. अथर्व-दौलतचे चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया नव्या जोमाने सुरू करण्यात आली. त्यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा विश्वास जपण्याचा आणि कारखान्याचे नाव पुन्हा उंचावण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी आणि लेखापाल यांनी रात्रंदिवस काम करून गावनिहाय पडताळणी पूर्ण केली. त्यांच्या प्रयत्नांचा यशामुळे म्हणून आज हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात एफ.आर.पी. रक्कम जमा झाली आहे.
चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचा प्रत्येक प्रश्न आम्ही आमचा समजून घेतो. थकीत एफ.आर.पी. हा प्रश्न आमच्यासाठी भावनिक होता, कारण ही रक्कम शेतकऱ्यांच्या कष्टाचा मोबदला आहे. अथर्व व्यवस्थापनाने ही जबाबदारी पारदर्शक पद्धतीने पार पाडली असून उर्वरित गावांची पडताळणी देखील अंतिम टप्प्यावर आहे. पुढील काही दिवसांत सर्व शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा पैसा मिळेल.” या पडताळणी प्रक्रियेत सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. बँक खाते पडताळणी, माहिती ताळमेळ, जुनी नोंदवही तपासणी आणि शेतकऱ्यांच्या तपशीलातील विसंगती अशा अनेक गोष्टींमुळे कामात वेळ लागत होता. परंतु अथर्व दौलत व्यवस्थापनाने कोणतीही तडजोड न करता एक एक टप्पा पूर्ण केला. आज या सर्व प्रयत्नांचे फलित म्हणजे ९५ गावांतील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर एफ. आर. पी.ची रक्कम जमा झाली आहे.
दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या घामाचा आणि श्रमाचा साक्षीदार आहे. या कारखान्याला पुन्हा सक्षम बनवणे ही आमची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांनी आणि तोडणी वाहतूकदारांनी या प्रक्रियेत पाठिंबा दिला पाहिजे. अथर्व व्यवस्थापन शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण अवलंबूनच पुढे जाणार आहे.” दरम्यान, पूर्व विभागातील काही गावांची पडताळणी आणि लेखापाल तपासणी सध्या अंतिम टप्प्यात सुरू आहे. या गावांतील शेतकऱ्यांची एफ.आर.पी. रक्कम लवकरच त्यांच्या खात्यात जमा केली जाईल. येणारा गळीत हंगामही लवकर सुरू होणार असल्याने अथर्व दौलत व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना, तोडणीदारांना आणि वाहतूकदारांना पूर्ण सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे.
या संपूर्ण उपक्रमामुळे चंदगड तालुक्यातील कृषी क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे. वर्षानुवर्षे थकीत असलेली रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. गावोगावी आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक शेतकऱ्यांनी अथर्व व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. “अथर्व दौलतने आमच्यावरचा विश्वास परत आणला. अनेक वर्षांनी आमच्या कष्टाचे पैसे मिळाले,” अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली जात आहे. अथर्व दौलत व्यवस्थापनाने दिलेला दिलासा केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक पातळीवरही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेली एफ.आर.पी. रक्कम अखेर त्यांच्या हाती आली आहे. त्यामुळे शेतकरी आणि कारखान्याचे नाते अधिक मजबूत झाले असून, दौलतची पाटी पुन्हा एकदा अभिमानाने उभी राहणार आहे.

 

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका