राजकारण

सौ. राजश्री लक्ष्मण गावडे व श्री. रविंद्र नामदेव बांदिवडेकर यांची प्रचारात आघाडी

अडकूर जि. प. व प. स. निवडणुकीत विश्वासाचे नेतृत्व पुढे

चंदगड : तालुक्यातील अडकुर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ. राजश्री लक्ष्मण गावडे तसेच  पंचायत समिती पदासाठी श्री. रविंद्र नामदेव बांदिवडेकर लढवत असलेल्या निवडणुकीत यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने परिसरात त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा सुरु आहे.कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही उमेदवारी म्हणजे सौ. राजश्री गावडे व रविंद्र बांदिवडेकर यांनी आजवर केलेल्या प्रामाणिक, पारदर्शक व लोकाभिमुख कार्याची योग्य दखल असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. आम. शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमुअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, मानसिंग खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद मतदार संघात प्रचार यंत्रणा जोमात राबिवली जात आहे. सामान्य नागरिकांशी थेट संवाद, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी घेतलेले निर्णय आणि विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे भक्कम स्थान निर्माण केले आहे.

लोकांशी घट्ट नाते, विश्वासार्ह नेतृत्व

सौ. राजश्री लक्ष्मण गावडे यांनी अडकूर मतदारसंघात सामाजिक, शैक्षणिक व विकासात्मक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून महिलांचे प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा मानस असल्याचे त्या मतदारांना सांगत आहेत.. त्यांचे कार्य हे केवळ आश्वासनांपुरते न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसून आले असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे. त्याचप्रमाणे रविंद्र नामदेव बांदिवडेकर यांनी अडकुर पंचायत समिती क्षेत्रात पारदर्शक प्रशासन, लोकाभिमुख निर्णय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे निर्णय आपण घेणार असल्याचे पटऊन देत आहेत. जनतेशी असलेली जवळीक हीच त्यांच्या ताकदीची बाजू मानली जात आहे. मतदार संघातील सर्वांगीण विकासासाठी दोन्ही उमेदवारांची दृष्टी व्यापक व प्रगतिशील असून रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, युवक व महिला सक्षमीकरण यासारख्या विषयांना प्राधान्य देण्याचा त्यांचा स्पष्ट अजेंडा आहे.  अडकुर जिल्हा परिषद गटाचा विकास, जनतेचा विश्वास आणि कौशल्यपूर्ण नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित ही वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.

भव्य विजयाची अपेक्षा कार्यकर्त्यांच्या कडून व्यक्त केली जात आहे. जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची साथ आणि नेतृत्वाची अनुभवसंपन्नता पाहता आगामी निवडणुकीत दोन्ही उमेदवार भव्य विजय मिळवतील, अशी ठाम अपेक्षा व्यक्त होत आहे.

राजकीय प्रवासासाठी त्यांना सर्व बाजूंनी शुभेच्छा देण्यात येत असून, चंदगड तालुक्याच्या विकासासाठी ही निवडणूक निर्णायक ठरेल, असे मत जाणकार नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका