ताजे अपडेट

मांडेदुर्ग येथे ” सैनिक आपल्या शाळेत ” उपक्रमाचे आयोजन

मांडेदुर्ग (प्रतिनिधी) : देशसेवेचा गौरव आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने श्री कुमार विद्यामंदिर, मांडेदुर्ग येथे येत्या शनिवारी ‘सैनिक आपल्या शाळेत’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या वीर सैनिकांचा सन्मान करत विद्यार्थ्यांना शिस्त, समर्पण आणि देशभक्तीची प्रेरणा देणे हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू आहे.

या कार्यक्रमास चंदगडचे गटशिक्षणाधिकारी  श्री. वैभव पाटील तसेच पोलीस निरीक्षक श्री. विश्वास पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सैनिकांचा सत्कार करण्यात येणार असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे.  शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० ते ११.३० या वेळेत श्री कुमार विद्यामंदिरच्या प्रांगणात पार पडणार आहे. परिसरातील माजी व विद्यमान सैनिकांनी गणवेशात उपस्थित राहून आपल्या सेवेचा प्रेरणादायी वारसा विद्यार्थ्यांसमोर मांडावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना या कार्यक्रमाला आवर्जून पाठवावे, जेणेकरून त्यांना सैनिकांचे अनुभव प्रत्यक्ष ऐकता येतील आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल, असेही व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

गावातील आणि परिसरातील सैनिकांचा सन्मान करत नव्या पिढीमध्ये देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका