आरोग्य

श्री आर्थो ॲण्ड ट्रॉमा सेंटर येथे सिमाभागातील रुग्णांच्यावर होणार मोफत उपचार

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य सेवा उपलब्ध

चंदगडः समाजातील गोरगरिबांना उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बेळगाव शहरात श्री ऑर्थो ॲण्ड ट्रॉमा सेंटरची स्थापना करण्यात आली. हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नुकताच महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत श्री ऑर्थो ॲण्ड ट्रॉमा सेंटरची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून आता हॉस्पिटलच्या माध्यमातून सीमाभागासह महाराष्ट्रातील रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. देवेगौडा इमागौडनावर यांनी केले आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांसाठी परवडणारी सेवा देण्याच्या उद्देशानेच श्री ऑर्थो ॲण्ड ट्रॉमा सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता हॉस्पिटलच्या कामगिरीत महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची भर पडली आहे. या योजनेचा केवळ महाराष्ट्रातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील रुग्णांना तर लाभ होणारच आहे, शिवाय बेळगाव, ग्रामीण, खानापूर, हुक्केरी, चिकोडी, निपाणी, अथणी सीमेजवळील सर्व गावांच्या बीपीएल-एपीएल कार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत हाड, मणक्यासह इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत. रेशनकार्ड व कुटुंबातील सदस्यांचे आधारकार्ड व इतर कागदपत्रांद्वारे रुग्णांना उपचार घेता येणार असून रुग्णांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय १३५६ पेक्षा अधिक उपचार, शस्त्रक्रिया व वैद्यकीय प्रक्रियांचा लाभही घेता येणार आहे.

श्री ऑर्थो ॲण्ड ट्रॉमा सेंटरमध्ये २४ तास आपत्कालीन व ट्रॉमा केअर, डिजिटल एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, फिजिओथेरपी, २४x७ फार्मसी, अनुभवी डॉक्टर्स, न्यूरो, जनरल सर्जन व युरोलॉजिस्ट विभागातही उत्तम टीम कार्यरत आहे. सरकारी व खासगी आरोग्य विमा योजना उपलब्ध आहेत.समाजातील गोरगरिबांना उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बेळगाव शहरात श्री ऑर्थो ॲण्ड ट्रॉमा सेंटरची स्थापना करण्यात आली. हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. नुकताच महाराष्ट्रातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत श्री ऑर्थो ॲण्ड ट्रॉमा सेंटरची अधिकृत नोंदणी करण्यात आली असून आता हॉस्पिटलच्या माध्यमातून सीमाभागासह महाराष्ट्रातील रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. देवेगौडा इमागौडनावर यांनी केले आहे.

शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका