राजकारण

तरुण नेतृत्त्वाचा विश्वासार्ह चेहरा पांडुरंग बेनके

तुर्केवाडी पंचायत समिती गणातुन राष्ट्रवादीचे उमेदवार

तुर्केवाडी (प्रतिनिधी): कार्वे तसेच परिसरातील गावांमध्ये लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जपणारे, तरुणाईचे प्रेरणास्थान आणि सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केलेले पांडुरंग बेनके हे माजी आमदार राजेश पाटील व डॉ. नंदाताई बाभुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्केवाडी पंचायत समिती गणातून घड्याळ ह्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.

कार्वे गावचे विद्यमान उपसरपंच म्हणून त्यांनी आतापर्यंत जबाबदारीने काम करत ग्रामविकासाला चालना दिली आहे. गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक व सहकारी संस्थांवर संचालक म्हणून कार्य करताना त्यांनी पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख निर्णयप्रक्रियेचा आदर्श निर्माण केला आहे.

सर्वसामान्यांच्या अडचणी मग त्या व्यक्तिगत असोत वा सामूहिक — त्या सोडवण्यासाठी पांडुरंग बेनके नेहमीच पुढाकार घेताना दिसतात. हलकर्णी औद्योगिक वसाहतीतील विनाशकारी AVH प्रकल्प तडिपार करण्यात त्यांनी मोठी भुमिका पार पाडली. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेतकरी प्रश्न, युवकांना रोजगाराच्या संधी अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवून प्रत्यक्ष कामातून उपाययोजना राबवल्या आहेत.

तरुण असूनही अनुभव, संयम आणि लोकसंपर्काची मजबूत पकड ही त्यांची ओळख बनली आहे. कोणताही गाजावाजा न करता शांतपणे काम करत विश्वास निर्माण करणे ही त्यांची कार्यपद्धती असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात आपुलकी व विश्वास दिसून येतो.

“विकास हा कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे” या विचारधारेतून ते कार्यरत असून पंचायत समितीच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास घडवण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे. त्यामुळे तुर्केवाडी पंचायत समिती गणात पांडुरंग बेनके यांना युवकांचे आशास्थान मानले जात असून त्यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकूणच स्वच्छ प्रतिमा, कार्यक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख दृष्टिकोन यामुळे पांडुरंग बेनके यांची उमेदवारी ही विकासाभिमुख परिवर्तनाची नांदी ठरेल, अशी भावना परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका