
विविध प्रश्नावर आंदोलन करत वेगळेपण दाखविणाऱ्या चंदगड तालुक्यातील शिंदे व उबाठा शिवसेना मात्र चंदगड नगरपंचायत निवडणूकीत थंड दिसत असल्याने अनेक चर्चेना ऊत आला आहे. सध्य स्थिती पाहता महायुतीतील प्रमुख असलेले भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांसमोर उभे असताना सत्तेतला शिवसेना शिंदे गटाचे अस्तित्व मात्र कोठेच दिसत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख असलेला शिवसेना उबाठा पक्षाची देखिल हिच अवस्था आहे.कारण आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसने राष्ट्रवादी अजित पवार गटाशी हात मिळवणे करून राजश्री शाहू आघाडी स्थापन केली मात्र त्यात शिवसेना उबाठा पक्षाला सामावून घेतलेलं नाही त्यामुळे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना दोन्ही शिवसेना मात्र एकाकी पडल्याचे चित्र आहे. शिंदे शिवसेनेकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पालक मंत्रीपद आहे त्या जिल्ह्यातच जर पक्षाला स्थान मिळत नसेल तर मग त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. जिल्ह्याचे प्रमुख ज्या भागात आहे तिथेच पक्षाला कोणी विचारत नाही अशी अवस्था झाली तर केवळ आंदोलन व निवेदने देण्यापुरतीच शिवसेना उरली आहे का असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांना पडने साहाजिकच आहे. तसं पाहायला गेल्यास चंदगड शहरासह तालुक्यात शिवसैनिकांची कमी नाही पण तालुक्याला तसे नेतृत्व सक्षम मिळालेले नाही. चंदगड तालुक्यातील सध्या नगरपंचायत निवडणुकीचे वातावरण तापले आहे. मंत्री हसण मुश्रीफ व आम. शिवाजीराव पाटील आपपला उमेदवार निवडुन आणण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे प्रत्येक गावात शाखा असलेल्या पक्षाला कोणी वालीच नसेल तर पक्षाची वाटचाल कशी होणार ?
