चंदगड तालुक्यात राहणार प्राथमिक व माध्यमिक शाळा शंभर टक्के बंद
शिक्षक समन्वय समितीचा निर्धार कायम

चंदगड तालुका शिक्षक समन्वय समिती यांची बैठक आज हलकर्णी येथे संपन्न झाली. तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा पाच डिसेंबर 2025 च्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. 15 मार्च 2024 चा संचमान्यता शासन निर्णय आदेश रद्द करण्यासंदर्भात, सक्तीची टीईटी परीक्षा, 2005 नंतर लागलेल्या सर्वांना सहसकट जुनी पेन्शन लागू व्हावी, शिक्षण सेवक पद रद्द व्हावे यासह अनेक मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. शासन स्तरावर त्याची दाद घेतली जात नाही. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात समन्वय समितीने सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात शंभर टक्के शिक्षकांनी सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे असा प्रयत्न केला जात आहे. यावेळी समन्वय समितीचे नेते अध्यक्ष सदानंद पाटील शिक्षक समिती अध्यक्ष राजाराम जोशी सर व सरचिटणीस विनायक पाटील, शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, एम आर जे पी एस अध्यक्ष विनायक गिरी सरचिटणीस सरचिटणीस बाळाराम नाईक सर, काष्ट्राइब संघटनेचे सरचिटणीस राम कांबळे व उपस्थित होते.



