जय महाराष्ट्र वि.का.स. सेवा संस्थेच्या चेअरमनपदी सुरेश गायकवाड, व्हाईस चेअरमनपदी नामदेव आवडण
हलकर्णी (ता. चंदगड) : येथील जय महाराष्ट्र वि.का.स. (विकास) सेवा संस्था मर्या. हलकर्णी यांच्या संचालक मंडळाची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीत संस्थेच्या चेअरमनपदी श्री. सुरेश गायकवाड तर व्हाईस चेअरमनपदी श्री. नामदेव आवडण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सोसायटीचे संस्थापक शिवाजीराव सावंत, बाबु आवडण यांच्याबरोबर स्थापणेपासुनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी व सभासदांच्या हितासाठी प्रभावी कार्य करण्याचा निर्धार नवनिर्वाचित चेअरमन श्री. सुरेश गायकवाड व व्हाईस चेअरमन नामदेव आवडण यांनी व्यक्त केला. सामाजिक, सहकार व विकास क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा संस्थेच्या प्रगतीस निश्चितच फायदा होईल, असा विश्वास उपस्थित संचालक मंडळाने व्यक्त केला.या निवडीबद्दल संस्थेच्या संचालक, सभासद व कार्यकर्त्यांनी श्री. गायकवाड व श्री. आवडण यांचे अभिनंदन केले



