
चंदगड तालुक्यातील २०२५ च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत महिलाराज प्रस्थापित झाले आहे.
यंदा चंदगड तालुक्यातील जिल्हा परिषदचे सर्व चार गट महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्याने राजकीय क्षेत्रात महिलांच्या सहभागाला नवी दिशा मिळाली असली तरी बऱ्याच इच्छुकांच्या स्वप्नावर पाणि फिरले आहे. जिल्हा परिषद आरक्षण सोडतीनुसार
गट क्र. ६५ अडकूर — महिला सर्वसाधारण
गट क्र. ६६ माणगाव — महिला ओबीसी नागरिकाचा मागास प्रवर्ग
गट क्र. ६७ कुदनूर — महिला सर्वसाधारण
गट क्र. ६८ तुडये — महिला ओबीसी नागरीकांचा मागास प्रवर्ग
यामुळे संपूर्ण चंदगड तालुका महिला नेतृत्वाच्या स्पर्धेने रंगणार असून स्थानिक स्तरावर अनेक महिला कार्यकर्त्या, माजी सरपंच, व ग्रामपंचायत सदस्य आता राजकारणात सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, या सोडतीमुळे ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाला बळ मिळेल तसेच स्थानिक स्वराज संस्थांमधील निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढल्याचे दिसते.
चंदगड पंचायत समितीच्या गटांमध्येही महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळाले आहे.
गवसे — अनुसूचित जाती महिला
कोवाड — नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
तुर्केवाडी — सर्वसाधारण
हेरे — सर्वसाधारण महिला
कुदनूर — सर्वसाधारण
तुडये — सर्वसाधारण महिला
अडकूर — सर्वसाधारण
माणगाव — नागरिकांचा मागास प्रवर्ग
या निकालानुसार पंचायत समितीच्या आरक्षणातही महिला उमेदवारांना मोठी राजकीय संधी प्राप्त झाली आहे. या दोन्ही सोडतींमुळे चंदगड तालुका महिला सक्षमीकरणाचा आदर्श ठरणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे.
शहरापासून ग्रामीण भागापर्यंत महिलांनी आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर स्थानिक विकास प्रक्रियेत सक्रिय भूमिका घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


