ताजे अपडेट

चंदगड-ताम्रपर्णी नदित मगरीचे दर्शन

परीसरात घबराहटीचे वातावरण

– चंदगड तालुक्यातील राजगोळी येचे ताम्रपर्णी नदीघाटाजवळ आठ दिवसांपासून मगरीचे दर्शन होत आहे. यामुळे नदीकडे जाणाऱ्या  शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण आहे. नदीघाट असल्याने या ठिकाणी गावातील महिला तसेच ग्रामस्थांचा वावर असतो. या ठिकाणी जनावरे घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. वन खात्याने जनजागृती करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. गुरुवारी राजगोळी बुद्रुक येथील सागर सडाके व महादेव पाटील हे नदीकाठी गेले होते. त्यावेळी त्यांना ही मगर निदर्शनास आली. त्यांनी मोबाईलद्वारे या मगरीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर जाहीर केल्यानंतर नदीकाठी वावर करणारे विविध गावांतील शेतकरी आता सतर्क झाले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका