ताजे अपडेट

डॉ. परशराम पाटील यांचा दौलत-अथर्वकडून सत्कार

चंदगडः राज्यातील सर्व किनारी भागातील लघु बंदरांचे नियोजन, विकास, व्यवस्थापन व नियंत्रण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र सागरी मंडळावर तज्ज्ञ संचालक म्हणून डॉ. परशराम पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल दौलत–अथर्व साखर कारखान्याच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. हा सत्कार दौलत–अथर्व साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी (पी. आर. ओ.) दयानंद देवण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. पाटील यांच्या कार्याची, सागरी क्षेत्रातील अनुभवाची व राज्याच्या विकासासाठी होणाऱ्या त्यांच्या योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली.                                                            डॉ. परशराम पाटील यांची महाराष्ट्र सागरी मंडळावर तज्ज्ञ म्हणून झालेली निवड ही राज्याच्या सागरी विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे लघु बंदरांच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.सत्कार प्रसंगी कारखान्याचे शामराव गावडे, सतिष नाईक कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका